Ad will apear here
Next
सिंहगड रस्त्याचा पर्यायी मार्ग लवकरच वाहतुकीसाठी खुला


पुणे : ‘सिंहगड रस्ता आणि परिसरात शहरातील विविध भागांमधून स्थलांतरित होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने वाहनांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होत आहे. यामुळे वाहतुकीवर ताण येत आहे. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन आम्ही उड्डाणपुलाअगोदर पर्यायी रस्त्याच्या कामाला प्राधान्य दिले. गेल्या काही दिवसांत या पर्यायी रस्त्याचे काम वेगाने चालू असून, लवकरच हा रस्ता वापरासाठी खुला होईल,’ अशी माहिती नगरसेविका मंजूषा नागपुरे यांनी दिली.

पु. ल. देशपांडे उद्यान ते फनटाइम अशा साडेचार किलोमीटर लांबीच्या पर्यायी रस्त्याचे काम सुरू झाले असून, पहिल्या टप्प्यातील जवळपास ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यात फनटाइम ते विश्रांतवाडीपर्यंतचा तीन किलोमीटरचा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. या सध्या चालू असलेल्या पर्यायी रस्त्याच्या कामाची नागपुरे यांनी नुकतीच पाहणी केली व अधिकाऱ्यांना हा मार्ग लवकरात लवकर खुला करण्याचे आदेश दिले.



‘आतापर्यंत या पर्यायी मार्गासाठी तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, कार्यकारी अभियंता अभिजित डोंबे व उपअभियंता विठ्ठल इंगवले यांच्या नेतृत्वाखाली हे काम वेगाने सुरू आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाईल,’ असे नागपुरे यांनी सांगितले. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZQFBU
Similar Posts
मंजूषा नागपुरेंकडून विश्रांतीनगर रस्त्याची पाहणी पुणे : सिंहगड रोडवरील विश्रांतीनगर येथे नगरसेविका मंजूषा नागपुरे यांनी नुकतीच पाहणी केली. या वेळी त्यांनी तेथील दुभाजक (डिव्हायडर) कट करून चौक मोठा करणे, लाइट व्यवस्था व रस्ता लवकरात लवकर सुरळीत करण्याबाबत सूचना दिल्या.
‘अर्बन फुटपाथ’मुळे सनसिटी रस्ता परिसर होणार ‘स्मार्ट’ पुणे : येत्या काही दिवसांत सनसिटी रस्ता परिसर अधिक स्मार्ट होण्याच्यादृष्टीने ‘अर्बन फुटपाथ’ (शहरी पदपथ) हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेतर्फे २०१६ पासून शहरात ‘पुणे स्ट्रीट प्रोग्रॅम’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व येथील पदपथाला अद्ययावत स्वरूप देण्यात आले
‘सिंहगड रस्त्यावरील विकासकामे मार्गी लागल्याचे समाधान’ पुणे : ‘सिंहगड रस्त्यावरील पायाभूत सुविधा, कलासंस्कृतीचा विकास आणि नागरिकांची सुरक्षितता या सर्वच बाबतींत गेली अनेक वर्षे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याची फळे आता दिसू लागली असून, ही विकासकामे मार्गी लागल्याचे पाहताना समाधान वाटत आहे,’ अशी भावना आमदार माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केली.
सनसिटी ते कर्वेनगर पुलाच्या कामासाठी हिरवा कंदील पुणे : सिंहगड रस्ता परिसर व कर्वेनगरला जोडणारा आणखी एक पूल लवकरच उभारण्यात येणार आहे. बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या या कामाला अखेर पुणे महापालिकेच्या २३ जानेवारी २०१९ रोजी झालेल्या मुख्य सभेत मान्यता मिळाली. सनसिटी ते कर्वेनगरला जोडणाऱ्या ३० मीटर रुंदीच्या मुठा नदीवरील पुलाचे काम आता लवकरच सुरू होईल

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language